उदगीर बाजार समितीचे पाच संचालक ठरले अपात्र

By राजकुमार जोंधळे | Published: June 26, 2024 10:43 PM2024-06-26T22:43:25+5:302024-06-26T22:43:46+5:30

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय

five directors of udgir bazar committee were disqualified | उदगीर बाजार समितीचे पाच संचालक ठरले अपात्र

उदगीर बाजार समितीचे पाच संचालक ठरले अपात्र

राजकुमार जाेंधळे, लातूर :उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच संचालक अपात्र ठरल्याचे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी निर्णय दिला. यात सभापतींचाही समावेश आहे.

निकालपत्रात म्हटले आहे, अर्जदार झुंजार गणपतराव पाटील, हणमंत सोपानराव शेळके आणि भिवाजी मोतीराम चिखले यांनी ८ जून २०२३ रोजी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम १० (२) अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यात बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हणमंतराव हुडे, संचालक पद्माकर मनोहर उगिले, श्यामराव समर्थ डावळे, बालाजी मष्णाजी देवकते, ज्ञानेश्वर विश्वंभर पाटील यांना बाजार समितीचे संचालक म्हणून अपात्र करून त्यांना संचालक पदावरून दूर करावे, असा अर्ज दाखल केला होता. गैरअर्जदार श्यामराव डावळे यांनी राज्याचे पणनमंत्री यांच्याकडे अर्ज करून लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सुनावणी न घेता. ती इतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे स्थलांतर करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुनावणी झाली.

महाराष्ट्र सहकारी संस्था समिती (समितीची निवडणूक) नियम १० मधील तरतुदीनुसार बाजार समितीचे प्रतिवादी सभापती व चार संचालकांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत शेती नाही. ते बाजार समिती सदस्य म्हणून अपात्रता धारण करत आहेत. त्यानुसार सभापती शिवाजीराव हनुमंतराव हुडे, पद्माकर मनोहर उगिले, श्यामराव समर्थ डावळे, बालाजी मष्णाजी देवकते, ज्ञानेश्वर विश्वंभर पाटील यांना संचालक पदावर अपात्र ठरवत असल्याचा निर्णय बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिला.

Web Title: five directors of udgir bazar committee were disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :udgir-acउदगीर