निलंगा तालुक्यात कृषी निविष्ठा केंद्रांचे पाच परवाने निलंबित

By हणमंत गायकवाड | Published: August 8, 2023 02:55 PM2023-08-08T14:55:38+5:302023-08-08T14:56:48+5:30

तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Five licenses of agricultural centers suspended in Nilanga taluk | निलंगा तालुक्यात कृषी निविष्ठा केंद्रांचे पाच परवाने निलंबित

निलंगा तालुक्यात कृषी निविष्ठा केंद्रांचे पाच परवाने निलंबित

googlenewsNext

लातूर : निलंगा तालुक्यातील पाच कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबनाची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

कृषी निविष्ठा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा व भावफलक सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाणांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, दुकानात वजन काटा न ठेवणे, विक्रीस ठेवलेल्या बियाणांचे स्त्रोत न ठेवणे, विहित मुदतीत परवान्याचे नूतनीकरण करून न घेणे आदी त्रुटी भरारी पथकाच्या तपासणीमध्ये आढळून आल्या होत्या. या कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाला होता.

या कारणांमुळे केली कारवाई
साठा फलक व भावफलक प्रदर्शित न केल्यास, साठा नोंदवहीतील साठा व प्रत्यक्षात साठा यामध्ये तफावत आढळून आल्यास, तसेच बियाणे व खताचा भावफलक, साठा नोंदवही अद्ययावत नसल्यास, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा घेत नसल्यास, विक्री बिलात बियाणांचा संपूर्ण तपशील लिहीत नसल्यास, दुकानात विक्रीस ठेवलेल्या उत्पादकाचा स्त्रोत समावेश करून न घेतल्यास, खताची अथवा बियाणांची लिंकिंग केल्यास विक्री केंद्राविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५, तसेच बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बियाणे नियम १९६८ व अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Five licenses of agricultural centers suspended in Nilanga taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.