शेतीच्या वादातून पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:33+5:302021-07-04T04:14:33+5:30
निलंगा पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील केळगाव येथील शेत शिवारातील गट क्र. ५३ अ मधील रस्त्यावरून लक्ष्मीबाई कांबळे, ...
निलंगा पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील केळगाव येथील शेत शिवारातील गट क्र. ५३ अ मधील रस्त्यावरून लक्ष्मीबाई कांबळे, पूजा कांबळे, लखन कांबळे, भिवा कांबळे हे गुरूवारी दुपारी ४ च्या सुमारास जाताना आरोपी लक्ष्मण पाटील, किशन पाटील, जागृती पाटील, मीरा पाटील, सुक्षंतबाई पाटील या पाच जणांनी हे शेत आमचे आहे. तुम्हांला आमच्या शेतातून जाण्यास रस्ता नाही, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच चापटांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर पाच वर्षांच्या बालकालाही मारहाण करून जखमी केले. तसेच त्याला उचलून घेऊन गेले आणि त्यास आपटून टाकले अशी तक्रार शत्रुघ्न कांबळे यांनी पोलिसांत दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे करीत आहेत.