सांगली, सातारा, काेल्हापुरातील पूरग्रस्तांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:30+5:302021-07-31T04:21:30+5:30
अड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या ब्रम्हनाळसह खटाव, माळवडी, भिलवडी आणि इतर गावांना प्रत्यक्ष भेट देऊन गावांची ...
अड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या ब्रम्हनाळसह खटाव, माळवडी, भिलवडी आणि इतर गावांना प्रत्यक्ष भेट देऊन गावांची पाहणी केली. मराठवाडा विभागीय महासचिव संतोष सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने भीमराव दळे, डॉ. सुरेश शेळके, अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना ब्लॅंकेट, जॅकेट्सचे वाटप करण्यात आले. पुराने शेती, घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. शासनाने भेदभाव न करता तातडीने सरसकट मतद करुन पूनर्वसन करावे, असे भीमराव दळे म्हणाले. तर संकटकाळात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वेळप्रसंगी आंदाेलन करुन न्याय, हक्क मिळवून देण्याची ग्वाही संताेष सूर्यवंशी यांनी दिली.
पुनर्वसनासाठी नागरिक तयार आहेत, मात्र लातूर, सांगलीत केलेले पुनर्वसन निकृष्ठ दर्जाचे आहे. असे निकृष्ट पुनर्वसन वंचित बहुजन आघाडी खपून घेणार नाही, असे डॉ. सुरेश शेळके म्हणाले. यावेळी स्थानिक पदाधिकारी किरण कांबळे, प्रशांत कोळी, मुरलीधर बनसोडे, नीलेश गवाले, अमित बंसोडे, अरुण थोरात यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.