सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयास टाळे

By आशपाक पठाण | Published: August 30, 2023 07:06 PM2023-08-30T19:06:27+5:302023-08-30T19:06:43+5:30

शेतकरी संतप्त : कमी दाबाने वीज पुरवठ्याची तक्रार

For smooth power supply, avoid Mahavitraman office | सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयास टाळे

सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयास टाळे

googlenewsNext

वलांडी (जि. लातूर) : गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी महावितरणकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वलांडीच्या महावितरण कार्यालयास टाळे लावले. विद्युत पुरवठा सुरळीत केल्याशिवाय टाळे काढणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महावितरण कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतातील उभी पिके डोळ्यासमोर करपू लागली आहेत. त्यात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी पाणी देवुन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हेळंब व धनेगाव या दोन गावांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युत मोटारी चालत नाहीत. शिवाय कधी तरी सुरळीत वीजपुरवठा झाला तरी काहीवेळातच पुन्हा वीज गुल होते. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरण कंपनीला कळवूनही वीज पुरवठा सुरळीत केला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आता आसमानी संकटाबरोरच सुलतानी संकट ओढवले आहे.

संतप्त झालेले शेतकरी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वलांडी येथील कार्यालयात जाऊन बसले. आपल्या समस्या मांडत असताना शेतकऱ्यांची चक्क कार्यालयास टाळे ठोकले. तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, उपसरपंच सोपान शिरसे, माजी सरपंच गुणवंत सावंत, कुमार पाटील, सिध्देश्वर सावंत, महेश शिरपुरे, मनोज सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेचे सुलतानी संकट...

पावसाने हुलकावणी दिल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर जोमात आलेले सोयाबीनेच करपत आहे. त्यातच ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा हे सुलतानी संकट आहे, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.

Web Title: For smooth power supply, avoid Mahavitraman office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.