लातुरात विदेशी दारूचा बाजार जोमात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 06:39 PM2020-05-18T18:39:49+5:302020-05-18T18:40:14+5:30

सोमवारी वाईन ५ हजार ३७३ तर  बिअरची विक्री ८ हजार लिटर्स

Foreign liquor market in full demand in Latur? | लातुरात विदेशी दारूचा बाजार जोमात ?

लातुरात विदेशी दारूचा बाजार जोमात ?

Next
ठळक मुद्देशहरात होम डिलेव्हरी नावालाच 

- आशपाक पठाण
लातूर : राज्य शासनाने लॉकडाऊन काळात फिजिकल डिस्टन्सिंग पाळला जावा आणि मद्य विक्री व्हावी, यासाठी शुक्रवारपासून होमडिलिव्हरी केली़ मात्र, बुकींग केलेले हजारो ग्राहक चार दिवसानंतरही वेटिंगवरच आहेत़  थेट दुकानदार ते ग्राहक  अशी विक्री अपेक्षित असताना यात नवीन साखळी तयार झालीे़ प्रत्यक्षात यातून मोठा काळा बाजार होत असून  दुप्पट ते तिप्पट दरात विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे़

लातूर जिल्ह्यातील ८ वाईन शॉप व २५ बिअर शॉपीमधून चार दिवसांपासून होमडिलिव्हरी सुरू असली तरी प्रत्यक्षात मागणी करणाऱ्या हजारो ग्राहकांपर्यंत मद्य पोहचले नसल्याची ओरड आहे़ शुक्रवारी दोन हजार ग्राहकांनी आॅनलाईन मागणी केली, त्यात केवळ ६ हजार लिटर्स डिलिव्हरी झाली़ शनिवारी दिवसभरात ६ हजार ३४० ग्राहकांनी मागणी नोंदविली असता त्यातील २ हजार ६३७ जणांना होम डिलिव्हरी झाल्याचा दावा प्रशासनाने केला़ मग एवढ्या ग्राहकांना ६ हजार लिटर्स दारू दिली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शिवाय, होम डिलिव्हरी असताना रविवार अन् सोमवारीही शहरात काही ठिकाणी मागच्या दारातून विक्री सुरू होती, त्यामुळे इथली गर्दी हटविण्यासाठी पोलीसही धावले़ मग होम डिलिव्हरी असताना दुकानावर गर्दी कशी? ओळखीच्या ग्राहकांना दारू दिली जात असून नवीन ग्राहकांना हाकलून दिले जात असल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला़

गर्दीच टाळायची तर ही दुकाने उघडा ?
वाईनच्या किंमतीपेक्षा दुप्पट, तिप्पट दर घेतले जात आहेत, पावती नसल्याने त्याचा बोभाटही नाही़ लातूर जिल्ह्यात देशी दारूची ९२ दुकाने आहेत, तर परवानाधारक बिअर बार ४७७ असून त्यातील ४२५ बार सुरू होते़ लॉकडाऊन काळात ही सर्व दुकाने बंद करण्यात आली़ गर्दीच टाळायची तर ही ५०० दुकाने सुरू व्हायला हवीत, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे़

बंद दुकानासंदर्भात शासनाला प्रस्ताव : बारगजे
जिल्ह्यात बिअर बार, देशी दारूच्या दुकानातून पार्सल सेवा सुरू करावी, यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे़ कोणती दुकाने सुरू ठेवायची अन् कोणती बंद याचा निर्णय शासनाचा आहे़ जिल्ह्यात सध्या ८ वाईन शॉपमधून होम डिलिव्हरी होत आहे़ रविवारी विदेशी दारू ५ हजार ९४८ लिटर्स व ३ हजार ९१९ लिटर्स बिअर तर सोमवारी ५ हजार ३७३ लिटर्स विदेशी, ८ हजार ९० लिटर्स बिअर्स विक्री झाली आहे़ किमतीपेक्षा अधिक रक्कम ग्राहकांनी देऊ नये, विक्रेत्यांनी तशी विक्री करू नये, अशा सूचना करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी सांगितले़

विक्रीचा आलेख वाढला़़़ (आकडा लिटर्समध्ये)
शनिवार - विदेशी ५१२२  बिअर ९३५  (लिटर्स)
रविवार  - विदेशी ५९४८   बिअर ३९१९ (लिटर्स)
सोमवार - विदेशी ५३७३  बिअर ८०९० (लिटर्स)

Web Title: Foreign liquor market in full demand in Latur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.