लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा 

By राजकुमार जोंधळे | Published: September 16, 2022 05:00 PM2022-09-16T17:00:14+5:302022-09-16T17:00:39+5:30

सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले.

Four medium projects overflow in Latur district! | लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा 

लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा 

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६९६.६ मिलीमीटर पाऊस पडला असला असून, लातूरला पुरवठा होणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात अद्यापही ४८.१७ टक्क्यावरच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे धरण शंभर टक्के भरण्यासाठी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. 'मांजरा'च्या तूलनेत निम्न तेरणा धरण मात्र पुर्ण क्षमतेने भरत आले आहे. यात सध्याला ९६.९३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले. मांजरा नदीवरील बोरगाव अंजनपूर, टाकळगाव, देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव, नागझरी, साई, खुलगापूर, शिवणी, बिंदगीहाळ, डोंंगरगाव, धनेगाव, होसूर व भूसनी बॅरेजसमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मांजरा नदीवरील १५ बॅरेजस भरले आहेत. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात होईल, असा पाऊस झाला नाही. परिणामी, पावसाळयाचे तीन महिने संपले तरी धरणात केवळ ४८.१७ टक्क्यावरच पाणीसाठा आहे.

मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. एकुंण पाणीसाठा २२४.०९३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणात ६३९.७४ मीटर पाणीपातळी आहे. एकुण पाणीसाठा १३२.३६६ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त साठ्याची टक्केवारी ४८.१७ आहे. 

चार मध्यम प्रकल्प भरले...
लातूर जिल्ह्यातील व्हटी, देवर्जन, साकोळ आणि घरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर तावरजा मध्यम प्रकल्पात ७२.२२ टक्के, रेणा प्रकल्पात ९८.१२ टक्के, तिरु प्रकल्पात ८१.२३ टक्के तर मसलगा मध्यम प्रकल्पात ८३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत एकुण ९०.९२ टक्के उपयुक्त पाणी आहे. १३२ लघु प्रकल्पांत ८७.९० टक्के तर जिल्ह्यातील एकूण १४२ प्रकल्पांत ७९.६२ टक्के उपयुक्त साठा आहे.

Web Title: Four medium projects overflow in Latur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.