लातूरच्या विलास साखर कारखान्याची फसवणूक, एका आरोपीस चार दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:09+5:302021-09-03T04:21:09+5:30
तक्रारदार अशोक तोडकर (विधी सहायक,विलास सहकारी साखर कारखाना,निवळी) यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक साखर ...
तक्रारदार अशोक तोडकर (विधी सहायक,विलास सहकारी साखर कारखाना,निवळी) यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून
भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक साखर कारखान्यास त्यांनी उत्पादित केलेल्या साखरे मधून काही साखर निर्यात करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे भारत सरकार कडून मिळालेल्या कोट्यातील कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरे पैकी ८ हजार ३६४ मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी कुरिंजी प्रो नॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,चेन्नई याचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख (रा. अहमदनगर) यांचे मार्फत साखर निर्यात करण्यासाठी चेन्नई येथील कुरुंजी प्रो. नॅचरल फूड्स प्रा. लि. या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. कंपनीने साखर उचलली. मात्र, निर्यात केलेले दस्तावेज मागणी करूनही दिले नाहीत. त्यामुळे कंपनीचे कार्यकारी संचालक चंद्राबाबू प्रदीपराज, चेअरमन मदिगा मनिकांत उर्फ मनीकृष्णा व मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुरूड पोलिसांनी मध्यस्थ अभिजित देशमुख याला बुधवारी अटक केले होते. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जावध, लातूर ग्रामीणच्या उप विभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनात मुरूडचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे करीत आहेत.