गुडसूरच्या शिबिरात ७०० जणांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:50+5:302021-09-05T04:24:50+5:30
उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी डॉक्टर्स ...
उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुनील बनशेळकीकर, प्रा. श्याम डावळे, राजाभाई सूर्यवंशी, सरपंच उत्तम सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी देमगुंडे, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गिलचे, तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उर्मिलाताई वाघमारे, शहराध्यक्षा ॲड. दीपालीताई औटे, जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती गायकवाड, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या तालुकाध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे, डॉ. विक्रम माने, ज्योती माने, सुस्मिताताई माने, रऊफ थोडगे, सलीम शेख, अस्लम पठाण आदींची उपस्थिती होती.
शिबिरात सामान्य रुग्णालयातील डॉ. तांबोळी, डॉ. येवते, डॉ. सुयेब शेख, डॉ. स्वामी, धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर व वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्र, गुडसूर येथील डॉक्टर, लायन्स क्लबच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. त्यासाठी तालुका सरचिटणीस किरण सूर्यवंशी, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.