खुनी हल्ला प्रकरणातील फरार आराेपी पाेलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:36+5:302021-08-01T04:19:36+5:30
पाेलिसांनी सांगितले, अक्षय राजू जाधव ऊर्फ काेद्रे, रा. गायत्रीनगर, लातूर याने खणी भागातील एका नागरिकावर कत्तीने वार करून जिवे ...
पाेलिसांनी सांगितले, अक्षय राजू जाधव ऊर्फ काेद्रे, रा. गायत्रीनगर, लातूर याने खणी भागातील एका नागरिकावर कत्तीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात महिनाभरापूर्वी कलम ३०७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टाेळीत पाचजणांचा समावेश हाेता. यातील तिघांना पाेलिसांनी यापूर्वीच अटक केली, तर अन्य दाेघेजण फरार हाेते. या टाेळीचा म्हाेरक्या असलेल्या अक्षय काेद्रे याला शिवाजीनगर ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याचा पाचवा साथीदार खंडू नामक आराेपी हा अद्यापही पाेलिसांना चकवा देत फरार असून, त्याच्या मागावर पाेलीस पथक आहे. या टाेळीतील पाचजणांविराेधात संबंधित पाेलीस ठाण्यात कलम ३०७, १४३, १४७, १४९ भादंविप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टाेळीकडून केला जात हाेता, असे शिवाजीनगर ठाण्याचे पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी म्हणाले. अक्षय काेद्रेला लातुरातून पाेलिसांनी अटक केली आहे. लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.