गादेवाडी, कोडगाव, वंजारवाडी, लिंगदाळ, नागझरी, तळेगाव, केंद्रेवाडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:02 AM2021-01-08T05:02:19+5:302021-01-08T05:02:19+5:30
अहमदपूर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी १ हजार ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ...
अहमदपूर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी १ हजार ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५५ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ७०९ जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. बहुतांश ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून हडोळतीस ओळखले जाते. हडोळती येथून ५२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग २ मध्ये १०, प्रभाग ४ मध्ये ११ व प्रभाग ६ मध्ये ११ उमेदवार आहेत, तसेच ढाळेगावातील प्रभाग ४ मध्ये १०, खंडाळीतील प्रभाग २ मध्ये १० उमेदवार आहेत. विविध २१ ग्रामपंचायतींमधील ७४ उमेदवार बिनविरोध निघाले आहेत.
७४ उमेदवार बिनविरोध...
तालुक्यातील २१ गावांतील ७४ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. तालुक्यातील गादेवाडी, कोडगाव, वंजारवाडी, लिंगदाळ, नागझरी, तळेगाव, केंद्रेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.