उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

By राजकुमार जोंधळे | Published: September 15, 2022 05:16 PM2022-09-15T17:16:44+5:302022-09-15T17:24:36+5:30

लातुरात रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; चोवीस तासानंतरही तरुणाची ओळख पटेना !

'Gajanan Jire' on the right hand and 'Love' on the left; The youth who died in the train collision was not identified | उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

Next

लातूर : रेल्वेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लातूर शहरातील साई रोड रेल्वे पुलानजीक बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी गेल्या २४ तासानंतरही एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्या तरुणाची ओळख काही अद्याप पटली नाही. सध्याला मृतदेह शवागरातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या आढळून आला होता. दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तरुणाच्या अंगात निळसर-काळसर टी-शर्ट, मळकट निळी जिन्स असे कपडे आहेत. शिवाय, उजव्या हातावर गजानन जिरे असे नाव तर डाव्या हातावर 'लव्ह'चं चिन्ह वर्तुळात गोंदवलेलं आहे, अशा वर्णनाचा व्यक्ती कोणी हरवला असेल, कोणी बेपत्ता झाला असेल तर पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी केले आहे.

विविध ठिकाणी शोध मोहीम...
लातूरसह शेजारच्या परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि बिदर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. वरील वर्णनाचा कोणी तरुण गायब झाला आहे का, याचाही तपास केला जात आहे. त्याचबरोबर राज्याच्या ग्रुपवर पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्र व्हायरल केले आहे.

Web Title: 'Gajanan Jire' on the right hand and 'Love' on the left; The youth who died in the train collision was not identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.