आष्टामाेड येथील जुगारावर धाड; पंधरा जणांविराेधात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: September 5, 2022 05:17 PM2022-09-05T17:17:49+5:302022-09-05T17:18:12+5:30
चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथे सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर पोलिसांची धाड मारली.
लातूर : जिल्ह्यातील आष्टामाेड (ता. चाकूर) येथे सुरु असलेल्या जुगारावर सहायक पाेलीस अधीक्षक यांच्या पथकाने साेमवारी पहाटेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी आकरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य चार जण पळून गेले आहेत. त्यांच्याकडून जवळपास साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात १५ जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशित दिले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर उपविभागामध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविराेधात कारवाई केली जात आहे. सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळालेल्या माहितीवरून चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथे सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर धाड मारली. तेथे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत असताना आढळून आलेले ११ व्यक्ती आणि पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेले चार अनोळखी व्यक्तींविराेधात चाकूर पाेलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण ४ लाख २७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई चाकूर येथील सहाय्यक फौजदार सुभाष हरणे, अमलदार मारुती तुडमे, उदयसिंग चव्हाण, विपिन मामडगे, रियाज शेख, रितेश आनंदूरकर यांनी केली.