डंम्पिंग ग्राऊंडवर पोहोचला कचरा

By Admin | Published: July 16, 2014 12:19 AM2014-07-16T00:19:28+5:302014-07-16T01:25:30+5:30

लातूर : डंम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर लातूर शहरातील कचरा गेल्या १२ दिवसांपासून ठप्प झाला होता़

Garbage on the dumping ground | डंम्पिंग ग्राऊंडवर पोहोचला कचरा

डंम्पिंग ग्राऊंडवर पोहोचला कचरा

googlenewsNext

लातूर : डंम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर लातूर शहरातील कचरा गेल्या १२ दिवसांपासून ठप्प झाला होता़ शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग अन् दुर्गंधीचा सामना करावा लागणाऱ्या शहरवासियांना मंगळवारी दिलासा मिळाला आहे़ स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कचरा उचलण्यास प्रारंभ केला असून दिवसभरात जवळपास १५० टन कचरा शहरातून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे़
लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून भेडसावत आहे़ वरवंटी, नांदगाव, बसवंतपूर येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला विरोध केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे़
डेपोवर लागणारी आग, पावसाळ्यातील दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा वावर, प्लास्टिकमुळे शेती नापिक होत असल्याचा त्रासास कंटाळून ग्रामस्थ हरित न्यायालयात गेले आहेत़ (प्रतिनिधी)
१२ दिवसांपूर्वी कचरा डेपोस आग लागली़ धुरामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा भरून आलेली वाहने पिटाळून लावत तीव्र विरोध सुरू केला़ मनपा प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात मार्गच निघत नसल्याने अखेर पोलिस संरक्षणात कचरा टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता़ मात्र, तोही मार्ग यशस्वी झाला नाही़ अखेर माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्याने हे प्रकरण तुर्तास तरी निवळले आहे़ त्यामुळे कचरा उचलायला सुरूवात झाली असली तरी १२ दिवसांत जमा झालेला कचरा आठ दिवसांत पूर्णपणे उचलला जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ त्यामुळे आणखी आठ दिवस कचऱ्याचा त्रास सहन करावा लागेल़
कचऱ्यामुळे दुर्गंधी़़़
मंगळवारी सकाळी महानगरपालिकेतील स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रेन मार्केट, गंजगोलाई, रिंगरोड, फ्रूट मार्केट आदी भागात ठप्प झालेला कचरा उचलण्यास प्रारंभ केला़ दिवभरात डंम्पिंग ग्राऊंडवर जवळपास ८० गाड्या कचरा टाकण्यात आला आहे़ शहरात सध्या हजारो टन कचरा पडला असला तरी आठ दिवसांत ठप्प झालेला सर्व कचरा उचलला जाईल, दिवभरात जवळपास १५० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक राऊत यांनी सांगितले़
४गेल्या आठ दिवसांपासून प्रशासन व ग्रामस्थांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते़ मात्र, ग्रामस्थांचे समाधान करण्यात प्रशासनाला यश आले नाही़ अखेर माजी राज्यमंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी कचराप्रश्नी मध्यस्थी केल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला़

Web Title: Garbage on the dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.