वर्षभरात गॅस सिलिंडर २२३ ने वाढले; मिळतेय केवळ ८ रुपये सबसिडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:15 AM2021-07-16T04:15:18+5:302021-07-16T04:15:18+5:30
शहरात चूलही पेटविता येत नाही... कोरोनामुळे हातचे काम गेले. त्यामुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागत आहे. त्यातच दिवसेंदिवस ...
शहरात चूलही पेटविता येत नाही...
कोरोनामुळे हातचे काम गेले. त्यामुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागत आहे. त्यातच दिवसेंदिवस गॅसचे दर वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन केले जाते. त्या काळात तर हाताला कामही मिळत नाही. गॅस संपलाच तर शहरात राहत असल्याने चूलही पेटविता येत नाही. शासनाने गॅसचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज आहे. - आशा कांबळे, गृहिणी
गॅसच्या दरात वाढ होत असल्याने चुलीचा पर्याय स्वीकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षभरात २०० हून अधिक रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांची गैरसाेय होत आहे. शासनानने गॅस दरवाढ कमी करून गोरगरिब मजुरांना आधार देण्याची गरज आहे. - माधुरी शिंदे, गृहिणी