दोन्ही हात नसलेल्या गौसला व्हायचंय आयएएस..!
By संदीप शिंदे | Published: May 22, 2024 12:40 PM2024-05-22T12:40:08+5:302024-05-22T12:40:17+5:30
ही किमया साधणारा गौस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्याने आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
लातूर : दोन्ही हात नसलेल्या गौस शेख याने पायांच्या बोटांनी पेपर लिहिला अन् बारावीच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळविले. ही किमया साधणारा गौस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्याने आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
लातूर तालुक्यातील वसंतनगर तांडा (महापूर) येथे रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून, तिथेच गौस अमजद शेख याने पहिली ते बारावीपर्यंतचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. जन्मत: दोन्ही हात नसलेल्या गौसने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. त्याला आई-वडिलांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. याच शाळेत गौसचे वडील अमजद शेख हे सेवक म्हणून कार्यरत असून, आई गृहिणी आहे.