शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या; निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: February 10, 2025 16:33 IST2025-02-10T16:32:47+5:302025-02-10T16:33:14+5:30

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी सोमवारी निलंगा येथे शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

Give farmers guaranteed price for soybeans; Sholay style protest by climbing a tower in Nilanga | शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या; निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या; निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

निलंगा (जि. लातूर) : सोयाबीनला हमीभाव देण्यात यावा तसेच नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी निलंगा येथील बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हमीभाव केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु, पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे जवळपास ३० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीविना रस्त्यावर आहे. सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी निलंगा येथील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब मिरगाळे, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, युवा सेनेचे प्रशांत वांजरवाडे, मेघराज पाटील, प्रशांत पेटे, रेखा पुजारी, देवता सगर, रेहाना सय्यद, मेहरान शेख आदींनी आंदोलन केले.

तीन तास आंदोलन...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीन तास आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Give farmers guaranteed price for soybeans; Sholay style protest by climbing a tower in Nilanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.