औराद शहाजानीला तालुक्याच्या दर्जा द्या; नागरीक, व्यापाऱ्यांतर्फे रॅली काढून प्रशासनास निवेदन

By संदीप शिंदे | Published: August 3, 2023 04:42 PM2023-08-03T16:42:36+5:302023-08-03T16:43:10+5:30

औराद शहाजानी तालुका झालाच पाहीजे, या घाेषणा देत औराद शहरातून ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून रॅली काढली.

Give Taluka status to Aurad Shahajani; Citizens, traders took out a rally and submitted a statement to the administration | औराद शहाजानीला तालुक्याच्या दर्जा द्या; नागरीक, व्यापाऱ्यांतर्फे रॅली काढून प्रशासनास निवेदन

औराद शहाजानीला तालुक्याच्या दर्जा द्या; नागरीक, व्यापाऱ्यांतर्फे रॅली काढून प्रशासनास निवेदन

googlenewsNext

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीस तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी नागरिक, व्यापाऱ्यांच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

औराद शहाजानी तालुका झालाच पाहीजे, या घाेषणा देत औराद शहरातून ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून रॅली काढली. बालाजी मंदिर, मेनराेड बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चाैकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. तेथून निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बालाजी भंडारे, राजाप्पा वलांडे, भरत बियाणी, हाजी सराफ, नुर पटेल, दाऊद मुल्ला, रवि गायकवाड, पद्मसिंह पाटील, जीवन कांबळे, राहुल मोरे, राजु रेड्डी, रवी गायकवाड, महेंद्र कांबळे, सुरेश पाटील, मल्लु लातुरे, दिपक थेटे, गोरख नवाडे, शेख खमर, विलास कांबळे, शहाजान नाईकवाडे, पंकज पाटील, महेबुब शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉ. अरविंद भातांब्रे, सुधाकर पाटील, पंकज शेळके, दयानंद चोपणे, मदन बिरादार, अमोल सोनकांबळे, अमोल नवटक्के, गोविंद पाटील, शिवपुत्र बिरनाळे, रंजीत सुर्यवंशी, गफार मोम्मीन, नंदू भंडारे यांच्यासह औराद, तगरखेडा, माने जवळगा, बोरसुरी, होसूर, तांबरवाडी, हालसी, शेळगी, सावरी गावातील नागरीक, शेतकरी, व्यापारी या रॅलीत सहभागी झाले होते.

Web Title: Give Taluka status to Aurad Shahajani; Citizens, traders took out a rally and submitted a statement to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.