विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:14 AM2021-07-03T04:14:03+5:302021-07-03T04:14:03+5:30
प्रारंभी हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके होत्या. ...
प्रारंभी हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके होत्या. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जतिन रहेमान, अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, जि.प. सदस्य धोंडिराम बिराजदार, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर यांनी कृषी विभागाच्या योजना व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त सीईओ संतोष जोशी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतात कीटकनाशके, तणनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी, सूत्रसंचालन उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी मानले.
पोकराचा लाभ घेऊन उन्नती साधावी...
सीईओ अभिनव गाेयल म्हणाले, शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या उत्पादन वाढ बरोबरच शेतीपूरक जोडव्यवसाय सुरु करावेत. तसेच पोकरा याेजनेचा लाभ घेऊन आपली उन्नती साधावी. पिकाचे पाणी व्यवस्थापन करुन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे म्हणाले, जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. पशुपालकांना मग्रारोहयो अंतर्गत गोठा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
उपाध्यक्षा सोळुंके यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कमी खर्चाचे उत्पादन तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करावे, असे सांगितले.