लातूरमध्ये टीबीमुक्त ४४ ग्रामपंचायतींचा गौरव

By हरी मोकाशे | Published: July 10, 2024 06:52 PM2024-07-10T18:52:13+5:302024-07-10T18:52:29+5:30

जि.प.चे सीईओ सागर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

Glory of 44 Gram Panchayats free of TB in Latur | लातूरमध्ये टीबीमुक्त ४४ ग्रामपंचायतींचा गौरव

लातूरमध्ये टीबीमुक्त ४४ ग्रामपंचायतींचा गौरव

लातूर : जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींनी टीबीमुक्तीचे निकष पूर्ण करीत टीबीमुक्त झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते बुधवारी गौरव करण्यात आला.

यावेळी पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. व्ही.जी. गुरुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. बरुरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.एस. हिंडोळे, प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.व्ही. जाधव, डॉ. गिरीजा ठाकूर, सम्यक खैरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी क्षयरोगमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे क्षयरोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होण्यास मदत होईल. प्रास्ताविक डाॅ. एस. एन. तांबारे यांनी, सूत्रसंचालन डॉ. एस.एन. बनशेळकीकर यांनी केले. आभार डॉ. एच.के. राऊत यांनी मानले.

सामुहिक प्रयत्नांमुळे यश...
मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर म्हणाले, क्षयमुक्त ग्रामपंचायती निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील आशा स्वयंसेवका, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग विभागाचे कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ४४ ग्रामपंचायती टीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनीही क्षयरोगमुक्तीसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल.

या ग्रामपंचायतींचा सन्मान...
देऊळवाडी, धडकनाळ, लिंबगाव, मादलापूर, मांजरी, चिगळी, करडखेल, उमरगा मन्ना, सोनावळा, पाटोदा बु., केकतसिंदगी, ढोरसांगवी, वडगाव, होकर्णा, उमदरा, माळहिप्परगा, बोळेगाव, आरी, करेवाडी, हालकी, वांजरखेडा, कांबळगा, धनेगाव, वडमुरंबी, बोंबळी खु., अंबानगर, सावरगाव, कामखेडा, नरवटवाडी, पळशी, भोकरंबा, आनंदवाडी, कासारशिरसी, नेलवाड, लांबोटा, राठोडा, भातांगळी, चिंचोलीराव, तांदुळजा, जानवळ, लातूररोड, चिंचोली जोगन या ४४ ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Glory of 44 Gram Panchayats free of TB in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.