किल्लारीमध्ये गाेदाम फाेडले; दाेन लाखांचे साेयाबीन पळविले

By राजकुमार जोंधळे | Published: January 21, 2023 06:32 PM2023-01-21T18:32:29+5:302023-01-21T18:32:36+5:30

शटरचे नट-बाेल्ट काढून गाेदामातील ५६ कट्टे साेयाबीन केले लंपास

Godam in Killari; Two lakhs worth of beans were stolen | किल्लारीमध्ये गाेदाम फाेडले; दाेन लाखांचे साेयाबीन पळविले

किल्लारीमध्ये गाेदाम फाेडले; दाेन लाखांचे साेयाबीन पळविले

Next

लातूर : शेतमालाचे गाेदाम फाेडून अज्ञात चाेरट्यांनी साेयाबीनचे ५६ कट्टे लंपास केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात १५ ते २० जानेवारी दरम्यान घडली. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, दीपक शामराव पाटील (वय ४२, रा. किल्लारी, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. किल्लारी परिसरात असलेल्या गाेदामाचे शेटरचे फाउंडेशन फाेडून, शटरचे नट-बाेल्ट काढून गाेदामातील ५६ कट्टे साेयाबीन (किंमत १ लाख ९४ हजार) अज्ञात चाेरट्यांनी चाेरून नेला. ही घटना १५ ते २० जानेवारी दरम्यान घडली असावी. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी किल्लारी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस हवालदार भाेळे करत आहेत.

साेयाबीनची चाेरी वाढली...
गत दाेन महिन्यांत शेतमाल चाेरणारी टाेळी सक्रिय झाली आहे. पेठ परिसरातील गाेदाम फाेडून शेतमाल चाेरट्यांनी पळविल्याची घटना गत महिन्यात घडली. तर किल्लारीतही गाेदाम फाेडून साेयाबीनचे कट्टे पळविले आहेत. शिवाय, एमआयडीसीतील गाेदाम फाेडून शेतमाल पळविल्याचीही घटना घडली आहे. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Godam in Killari; Two lakhs worth of beans were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.