खुशखबर ! सलग तिसऱ्या दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 07:46 PM2020-06-02T19:46:25+5:302020-06-02T19:46:55+5:30

आजचे २३ स्वॅब निगेटिव्ह आले

Good news! For the third day in a row, all reports from Latur district were negative | खुशखबर ! सलग तिसऱ्या दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह

खुशखबर ! सलग तिसऱ्या दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह

Next

लातूर : कोविड १९ चाचणीत सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यातील २३ पैकी २३ अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत २ जून रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी शहरातील २२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते, ते सर्वच निगेटीव्ह आले आहेत.  

दरम्यान उदगीर उपजिल्हा रुग्णालय येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता, तोही निगेटिव्ह आला आहे. असे एकूण २३ व्यक्तींचे स्वॅब तापसणीला आले होते, जे सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

Web Title: Good news! For the third day in a row, all reports from Latur district were negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.