शासकीय रूग्णालयात वर्षातून दोनदा फायर, विद्युत ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:20+5:302021-01-13T04:48:20+5:30

विज्ञान संस्थेच्या एका इमारतीचा अपवाद वगळता बहुतांश इमारती नव्या आहेत. परिणामी, स्थापत्य, इलेक्ट्रीकलबाबत काही समस्या किरकोळ स्वरूपाच्या आहेत. ...

Government hospital fire twice a year, electrical audit | शासकीय रूग्णालयात वर्षातून दोनदा फायर, विद्युत ऑडिट

शासकीय रूग्णालयात वर्षातून दोनदा फायर, विद्युत ऑडिट

Next

विज्ञान संस्थेच्या एका इमारतीचा अपवाद वगळता बहुतांश इमारती नव्या आहेत. परिणामी, स्थापत्य, इलेक्ट्रीकलबाबत काही समस्या किरकोळ स्वरूपाच्या आहेत. फायर सेफ्टीच्या अनुषंगाने मात्र त्रुटी असल्याचे अग्नीशमन विभागाच्या अधिका-यांनी ऑडिट पाहणीत मत नोंदविले आहे. नळकांड्या, अग्नीशामक कुपी बसविण्याच्या सूचना मनपाच्या अग्नीशामन अधिका-यांनी केल्या आहेत. अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसुतीगृह, नवजात अतिदक्षता कक्ष, बालरोगशास्त्र, अतिदक्षता कक्ष, औषध वैद्यकशास्त्र, शस्त्रक्रिया गृहे, इतर कक्ष तसेच रूग्णालयातील व्हरांडा आदीची पाहणी झाली. या पाहणीत विद्युत दुरूस्त्या, स्थापत्य निगडीत गळती, दुरूस्ती, आणि रूग्णालयीन इमारतींमध्ये नवीन अग्नीशामक कुपी बसविण्याच्य सूचना करण्यात आल्या.

जुन्या इमारतीत गळती

रूग्णालय परिसर स्वच्छ असला तरी जुन्या इमारतीमध्ये छतगळती आहे. कार्यकारी अभियंता स्थापत्य यांच्या ही बाब निदर्शनास आली असून, त्यांनी दुरूस्ती सुचविली आहे. विद्युतअभियंता आणि अग्नीशमन अधिका-यांनीही जुन्या, नवीन इमारतीची पाहणी करून विद्युत दुरूस्त्या सुचविल्या आहेत. त्यानुसार अग्नीशामन सुरक्षा उपाययोजना करण्याबाबतची मागणी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

गतवर्षी आणि यंदाही ऑडिट...

गतवर्षी तसेच यंदाही सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थापत्य, विद्युत आणि महानगर पालिकेच्या अग्नीशामक विभागाकडून ऑडिट करण्यात आले. त्या ऑडिटमध्येही स्थापत्य गळती, विद्युत दुरूस्त्या आणि अग्नीशामक कुपी बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. रविवारी झालेल्या ऑडिटमध्येही याच सूचना करण्यात आल्या आहेत. भंडारा घटनेच्ग्नच्या पार्श्वभूमीवर सदर ऑडिट गांभीर्याने घेतले जात आहे.

शासकीय रूग्णालयात सर्व सुविधा मिळतात. सोनोग्राफी, एक्स-रे सुविधाही खाजगीपेक्षा अतीउत्तम असल्याचा अनुभव आला. मी दोनवेळेस अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाल्यानंतर ॲडमिट होतो. येथील स्टाफही मनमिळावू असल्याने कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. फक्त औषधांचा तुटवडा जानवला. स्वच्छताही चांगली आहे. - शेखअली शेख

बसवंतपूर जि. लातूर

पी.जी.च्या मुलांवर हा दवाखाना अवलंबून आहे. पदव्युत्तर पदवीचे डाॅक्टर रात्रंदिवस वार्डमध्ये रूग्णसेवेत असतात. त्यांच्या ड्युटीमध्ये रूग्णसेवा चांगली होते. कायमस्वरूपी डाॅक्टर आणि प्राध्यापकांचे रूग्णांकडे येणे-जाणे कमी आहे. त्यांच्या मार्गदर्शनात मात्र सदर डाॅक्टर रूग्णसेवा चोख बजावतात. हा आपला अनुभव आहे. सेवा चांगली आहे.

- अंजली गरडे

वैभवनगर, लातूर.

दरवर्षी ऑडिट अन् केल्या जातात उपाययोजना

इमारत बांधकाम, विद्युत यंत्रसामुग्री आणि फायर व्यवस्थेच्या अनुषंगाने ऑडिट केले जाते. गतवर्षी तसेच दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयाच्या रूग्णालयाचे ऑडिट करण्यात आले होते. ऑडिटमध्ये केलेल्या सूचनेनुसार दुरूस्त्या केल्या गेल्या. आता सूचविल्याप्रमाणेही दुरूस्त्या केल्या जात आहेत.

- डाॅ. शैलेंद्रकुमार चव्हाण प्रभारी अधिष्ष्ठाता

Web Title: Government hospital fire twice a year, electrical audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.