ग्रा.पं. निवडणूक; तालुकानिहाय स्ट्राँगरुम, मतमोजणी ठिकाण निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:49+5:302021-01-08T05:00:49+5:30
लातूर स्ट्राँगरुम - शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन बार्शी रोड, मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे. औसा स्ट्राँगरुम व मतमोजणीचे ठिकाणी ...
लातूर स्ट्राँगरुम - शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन बार्शी रोड, मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे. औसा स्ट्राँगरुम व मतमोजणीचे ठिकाणी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय परिसर राहणार आहे. रेणापूर तालुका तळमजला तहसील कार्यालय, चाकूर तालुका प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, अहमदपूर तालुका औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड रोड अहमदपूर, उदगीर तालुक्यासाठी तहसील कार्यालय, निलंगा औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा, जळकोट तालुक्यासाठी महसूल हाॅल तहसील कार्यालय जळकोट स्ट्राँगरुम तर मतमोजणी तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे. देवणी तालुक्याची स्ट्राँगरुम तहसील कार्यालय राहणार असून, मतमोजणी तेथेच होणार आहे. तर शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी नायब तहसीलदार महसूल-१ यांचा कक्ष स्ट्राँगरुम राहणार आहे. तर तहसील कार्यालय सभागृहात मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळी १० वाजेपासून मतमोजणी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार ठरवून दिलेल्या स्ट्राँगरुमच्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जाणार आहेत. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.