Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर

By हरी मोकाशे | Published: December 20, 2022 05:41 PM2022-12-20T17:41:20+5:302022-12-20T17:41:27+5:30

हावरग्यात पंजाबराव पाटील यांना चिठ्ठीने दिला कौल

Grampanchayat Result: In Jalkot, BJP's leads, Maha Vikas Aghadi came second | Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर

Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर

Next

जळकोट (लातूर) : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. येवरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवार नसल्याने तेथील जागा रिक्त राहिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. दुसऱ्या स्थानावर महाविकास आघाडी राहिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा एक उमेदवार सदस्य झाला आहे. दरम्यान, हावरगा येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठीच्या जनार्दन माने आणि पंजाबराव पाटील यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. चिठ्ठीची लॉटरी पंजाबराव पाटील यांना लागली.

तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या करंजीच्या सरपंचपदी भागवत सोनटक्के हे विराजमान झाले आहेत. उमरदरा सरपंचपदी यमुनाबाई बालाजी गुट्टे, सिंदगीच्या सरपंचपदी बायनाबाई संदीपान कांबळे, होकर्णा दामोदर बोडके, चेरा प्रकाश माने, लाळी खु. साक्षी विजयकुमार बिराजदार, हावरगा अनुराधा ज्ञानेश्वर भोपळे, उमरगा रेतू राजकुमार पन्हाळे, गुत्ती मीना यादव केंद्रे, माळहिप्परगा सुनीता रामचंद्र केंद्रे, पाटोदा बु. सुनील नामवाड, जगळपूर अश्विनी संदीप लोहकरे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत एकूण ५० जणांनी नोटाला पसंती दर्शविली. १२ गावच्या सरपंचपदासाठी एकूण ४५ उमेदवार रिंगणात होते. तसेच ११३ सदस्यांच्या निवडीसाठी २४९ उमेदवार नशीब अजमावित होते. त्यामुळे अटीतटीच्या लढती झाल्या होत्या.

सदस्य पदासाठीचे विजयी उमेदवार...
चेरा - दिगंबर कावलवाड, जयश्री कटके, गोपाळ मोरे, झुंबर वाघमारे, प्रभावती मोरे, संतोष गडमे, भागवत माळी, बेबी गायकवाड, बालाजी किल्लेवाड.

पाटोदा बु. - रामचंद्र जाधव, इंदुताई मुछेवाड, अनिता काळे, लक्ष्मण केंद्रे, शांताबाई नावंदगे, तांबोळी मोमलबी, नवनाथ नामवाड, लहुकुमार माडे, भाग्यश्री नामवाड.
होकर्णा - चंद्रकांत डोणगावे, पूनम गुंडरे, शेख जुबेदाबी, आकाश राऊतराव, सुलोचना मोरे, छाया देवकते, नामदेव बोडके, मल्लिकार्जुन भुरे, जमुनाबाई मोरे.

करंजी - बाबू घोटरे, सुमन घोटरे, लता सोनटक्के, गुंडू टाले, आम्रपाली कांबळे, दत्तात्रेय श्रीमंगले, शिला नरवटे,
येवरी - स्नेहलता कांबळे, अहिल्याबाई भाले, सोमनाथ वाकळे, कौशल्य गव्हाणे, ज्ञानेश्वर वाकळे, अर्चना तीर्थे.

उमरदरा - ज्ञानोबा गुट्टे, मंजुळा गुट्टे, राजू गुट्टे, शोभा गीते, किशन मोरे, नंदुबाई गुट्टे.
सिंदगी - सुनील बामणे, पिंजारी नसरुद्दीन, कांताबाई कांबळे, वैशाली केंद्रे, संगीता दळवे, मीनाबाई गौंड, राजू गीते, प्रयाग चाटे, लक्ष्मीबाई दळवे.

लाळी खु.- दामोदर भालेराव, यशोदा कांबळे, उषा उळागड्डे, माधव मिरजगाव, मंगलाबाई देवशेट्टी, गुणवंतराव पाटील, सुमन पाटील.
हावरगा - पंजाबराव पाटील, कमलबाई कांबळे, कौशल्याबाई पवार, गणेश पवार, गीताबाई चट, वंदनाबाई चट, संभाजी मोरे.

उमरगा रेतू - गणपती भोगे, सुमेधा केंद्रे, अनुराधा ढोबळे, देशमुख खलीलमियाँ, द्रौपदाबाई भुरे, बालाजी केंद्रे, अंकुश गिते, देशमुख आशिया बेगम.
गुत्ती - व्यंकट मुंडे, चंद्रभागा सूर्यवंशी, देविदास सांगळे, जयश्री केंद्रे, अनुसया केंद्रे, पुंडलिक सूर्यवंशी, यादव केंद्रे, उज्ज्वला मोरे, कल्पना मोरे.

माळहिपरगा - वर्षा केंद्रे, द्रौपदा सोनकांबळे, नारायण केंद्रे, इंदुमती केंद्रे, सुंदराबाई केंद्रे, पांडुरंग तिडके, उर्मिलाबाई केंद्रे, शेवंताबाई केंद्रे, बालाजी गोरेवार, कैलास आडे, शितल जाधव.
जगळपूर - नरसिंग मोठे, शामराव लोहकरे, निर्मला लोहकरे, शेख मोहम्मद उमर, आम्रपाली वाघमारे, सीमा दुरनाळे, आकाश वाघमारे, हलीमाबी देशमुख, ईश्वर बेंबरे, पुंडलिक पोद्दार, भाग्यश्री बुके हे सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.

यावेळी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार राजाराम खरात, शिवराज एमपल्ले, आर. पी. शेख, अलिम शेरवाले आदींनी काम पाहिले.

Web Title: Grampanchayat Result: In Jalkot, BJP's leads, Maha Vikas Aghadi came second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.