लातूर जिल्ह्यात वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 07:33 PM2018-07-13T19:33:56+5:302018-07-13T19:35:25+5:30
सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़
जळकोट ( लातूर) : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करून त्याची जोपासणा करावी़ सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़
जळकोट पंचायत समितीच्या सभागृहात १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत आयोजित आढावा बैठकीत ते शुक्रवारी बोलत होते़ यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़यावेळी तहसीलदार शिवनंदा लंगडापुरे, गटविकास अधिकारी जे.डी. गोरे, पंचायत समिती सभापती व्यंकटराव केंद्रे, उपसभापती स्वाती केंद्रे, पंचायत समिती सदस्य बालाजी ताकबीडे, सुनंदा धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी राजाराम खरात, नगरसेविका रोहिणी केंद्रे, बाबुराव जाधव, सोमेश्वर सोप्पा, खादर लाटवाले, बालाजी डुकरे, डॉ.प्रशांत कापसे, सत्यवान पाटील, बाबुराव गुट्टे, बालाजी सिंदगीकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन जे.डी. गोरे यांनी केले़ आभार एच.आर. राठोड यांनी मानले.
दर आठवड्यास तपासणी
यावेळी तिरुके म्हणाले, वृक्ष लागवडीचे तालुक्यासाठी पावणेदोन लाख उद्दिष्ट आहे़ यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे़ हा तालुका मी दत्तक घेतला असून दर आठवड्यास समितीमार्फत वृक्ष लागवडीची तपासणी केली जाणार आहे.