भरघोस शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा उदगिरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:14 AM2021-07-03T04:14:16+5:302021-07-03T04:14:16+5:30

येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा येथील प्रगतशील शेतकरी बापूराव रक्षाळे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय ...

Greetings to the farmers who have taken a lot of agricultural produce | भरघोस शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा उदगिरात सत्कार

भरघोस शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा उदगिरात सत्कार

Next

येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा येथील प्रगतशील शेतकरी बापूराव रक्षाळे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, पं.स.चे माजी सभापती विजयकुमार पाटील, मंडळ कृषी अधिकारी राधा चिरके, पं.स. मनोज गोंदेगावे, सुभाष कांबळे, रणजित कांबळे, नरसिंग जाधव, कोंबले उपस्थित होते.

मंडळ कृषी अधिकारी राधा चिरके यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी नाबदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व सद्य:स्थितीत पीक परिस्थितीनुसार करावयाचे नियोजन यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी नागेश पाटील व राजेंद्र मुळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन दुरुगकर यांनी केले. आभार कृषी सहाय्यक एस. आर. कांबळे यांनी मानले.

रबी ज्वारी उत्पादनात शेख प्रथम...

रबी हंगामात तालुक्यात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात रब्बी ज्वारीत बहाद्दूरसाहेब गुलाबसाहेब शेख वायगाव, संजय भद्रशेट्टे दावणगाव, मधुकर गुडे महादेववाडी, गहू पिकात ज्ञानेश्वर बिरादार खेर्डा, गोविंद कानवटे वाढवणा, राधा रक्षाळे लोहारा, तर हरभरा पिकात नीळकंठ मोरतळे कोदळी, जितेंद्र शेळके लिमगाव, बालाजी अनंतवाड निडेबन यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

Web Title: Greetings to the farmers who have taken a lot of agricultural produce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.