गाेपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:35+5:302020-12-17T04:44:35+5:30
लातूर : तालुक्यातील हरंगुळ बु. परिसरातील माताेश्री कलावती प्रतिष्ठान संचलित लाॅर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये लाेकनेते गाेपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ...
लातूर : तालुक्यातील हरंगुळ बु. परिसरातील माताेश्री कलावती प्रतिष्ठान संचलित लाॅर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये लाेकनेते गाेपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी श्रीकृष्ण लाटे, शाळेचे समन्वयक राैफ शेख, मकरंद सबनीस, नम्रता डांगे, रुपाली काेकाटे, गणेश इरकर, विद्या कदम यांच्या हस्ते गाेपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती.
सेवालयातील विद्यार्थ्यांना राेटरी क्लबची भेटवस्तू
लातूर : औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालयातील एड्स संक्रमित विद्यार्थ्यांना राेटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी राेटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. नंदकिशाेर लाेया, सचिव पुरुषाेत्तम नाेगजा, प्रकल्प प्रमुख चंद्रकांत गुंडरे, विशाल जाधव यांच्यासह संजय आळंदकर, बाहासाहेब खैरे, श्रीकांत आग्राेया, रमाकांत जाेशी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी सेवालयातील विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित हाेते.
महाकवी गदिमांच्या स्मारकासाठी आंदाेलन
लातूर : महाकवी ग. दी. माडगुळकर यांचे स्मारक उभारावे या मागणीसाठी साेमवारी येथील गांधी चाैकात जनआंदाेलन करण्यात आले. यावेळी प्रा. डाॅ. राजशेखर साेलापुरे, डाॅ. संजय जमदाडे, डाॅ. एस.एस. कुलकर्णी, बंकट पुरी, प्रकाश घादगिने, अभय करंदीकर, ॲड. मुकेश काेळपकर, देविकुमार पाठक, प्रा. डाॅ. जयद्रथ जाधव, प्रा. डाॅ. दुष्यंत कटारे, शैलजा कारंडे, प्रा. नयन राजमाने, विजया भणगे, वृषाली पाटील, सुरेश गिर, प्रा. दत्ता साेमवंशी, प्रा. विश्वनाथ हाेळकुंदे, विश्वांभर भाेसले, संजय काेळी, पवन पाटील, लक्ष्मीकांत जायभाये, पंढरीनाथ जाधव, राम रेड्डी, सतीश इंडे, डाॅ. श्रीराम काेळेकर, अमृता पाेहरे, विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
कुष्ठराेग, क्षयराेग सर्वेक्षण माेहीम
लातूर : शहर आणि जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, जळकाेट, चाकूर, देवणी, निलंगा, औसा, शिरुर अनंतपाळ आणि रेणापूर तालुक्यात आराेग्य विभागाच्या वतीने कुष्ठराेग, क्षयराेग सर्वेक्षण माेहीम राबविण्यात येत आहे. यासाठी आराेग्य विभागातील कर्मचारी माेहिमेवर आहेत. जळकाेट तालुक्यात या माेहिमेंतर्गत १३ काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना उदगीर आणि लातूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या माेहिमेत आराेग्य कर्मचारी घराेघरी जात तपासणी करुन सर्वेक्षण करत आहेत. यातून कुष्ठराेग आणि क्षयराेग असलेल्या रुग्णांचा आकडा समाेर येणार आहे. या माेहिमेसाठी जिल्हा आराेग्य प्रशासनाबराेबरच त्या-त्या भागातील आराेग्य केंद्र, उपकेंद्रातील कर्मचारी अधिक पुढकार घेत आहेत.