मुक्तांगण स्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:02+5:302021-01-13T04:49:02+5:30
दयानंद कला महाविद्यालयात जयंती साजरी लातूर : दयानंद कला महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात ...
दयानंद कला महाविद्यालयात जयंती साजरी
लातूर : दयानंद कला महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. संदीपान जगदाळे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. सुनीता सांगोले, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. रमेश पारवे, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, महेंद्र कोराळे, आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ३०५ रुग्णांवर उपचार सुरू
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ३०५ जणांवर उपचार सुरू असून, त्यांपैकी १८३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांवर भर दिला जात असून, दररोज १२०० हून अधिक चाचण्या केल्या जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
बंद असलेले सिग्नल सुुरू करण्याची मागणी
लातूर : शहरातील काही मुख्य चौकांतील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे. एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात अवजड वाहनांची लगबग असते. त्यातच सिग्नल बंद असल्याने दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच रात्रीच्या वेळी याच चौकात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स बसेस थांबतात. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नायलॉन मांजाची विक्री करण्यास बंदी
लातूर : जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या विक्रीस आणि साठवणुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. तसेच पोलीस विभागाने नागरी आणि ग्रामीण भागांत स्वतंत्र पथके तैनात करून नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंध घालावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. त्यामुळे अपघाताचा धोका असल्याने प्रतिबंध करण्यात आला आहे.
आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी करावी
लातूर : जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. आंबा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. या कीड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चाकूर, औसा, उदगीर व लातूर तालुक्यांत कृषी विभागाच्या वतीने कीड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून फवारणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिंग रोड परिसरात रस्त्यावर पार्किंग
लातूर : एमआयडीसी परिसरातील रिंग रोड भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अनेकजण रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहने पार्किंग करीत आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वाहने सुसाट धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सदरील रस्त्यावरील पार्किंगकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.