संत गाडगेबाबा यांना उदगीरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:58+5:302020-12-24T04:18:58+5:30
... वीज उपकेंद्रासाठी जागेची केली पाहणी बेलकुंड : अतिरिक्त भार पडत असल्याने वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे येल्लोरी येथे ...
...
वीज उपकेंद्रासाठी जागेची केली पाहणी
बेलकुंड : अतिरिक्त भार पडत असल्याने वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे येल्लोरी येथे वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन जागेची पाहणी केली. औशाचे कार्यकारी अभियंता जाधव, बेलकुंड येथील कनिष्ठ अभियंता अमित शृंगारे यांनी येल्लोरी येथे जागेची प्राथमिक पाहणी केली. पाहणीचा अहवाल संबंधित विभागाकडे देण्यात येणार आहे, असे सांगितले.
...
वीजपुरवठा खंडित, शेतकरी हतबल
निलंगा : कासारशिरसीसह परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव होत आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे या भागातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला. मात्र, सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. महावितरणने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
...
मुरुड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम
मुरुड : येथील शेतकरी अशोक सपकाळ यांच्या शेतात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हरभरा शेतीशाळा पार पडली. यवेळी कृषी सहाय्यक आनंद निकम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोखराचे दत्तात्रेय भडंगे यांनी पीक संरक्षण करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात माहिती दिली. एकरी ८५ टन ऊस उत्पादन घेतलेले लहू पटाडे यांचा सत्कार करण्यात आला. शेतीशाळेस अशोक सपकाळ, चंद्रकांत पटाडे, महेश कणसे, बालाजी मोरे, हनुमंत नाडे आदी उपस्थित होते.