वरवंटी कचरा डेपोतील सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:08+5:302020-12-22T04:19:08+5:30
यावेळी मनपा अधिकारी, जनाधार संस्था यांच्याकडून सर्व कामाची माहिती घेतली. तसेच संबंधित मनपा अधिकारी, जनाधार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ...
यावेळी मनपा अधिकारी, जनाधार संस्था यांच्याकडून सर्व कामाची माहिती घेतली. तसेच संबंधित मनपा अधिकारी, जनाधार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कचरा संकलन, विघटन, खत व लिक्विड निर्मिती याबाबत आवश्यक त्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, जनाधार संस्थेचे संजय कांबळे, मनोहर कोरे, लक्ष्मण कांबळे, उपआयुक्त श्रीमती गुरमे, बी.एम.थोरात, किरण जाधव, रविशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, आसिफ बागवान, सुपर्ण जगताप, प्रमोद जोशी, महेश काळे, सचिन गंगावणे, सुमित खंडागळे, इसरार पठाण यांच्यासह मनपा सदस्य, पदाधिकारी, मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शादीखाना, गंजगोलाई सुशोभिकरण कामाचीही पाहणी
शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली. सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पूर्णाकृती पुतळा उभारणी काम, अण्णा भाऊ साठे चौक ग्रेन मार्केट भागात सुरू असलेल्या शादीखाना बांधकाम, तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई सुशोभिकरण कामाची पाहणी यावेळी करण्यात आली.