सैन्यदलातील गुट्टेवाडीच्या जवानाचे कोलकाता येथे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:29 PM2022-03-22T22:29:05+5:302022-03-22T22:31:58+5:30
अनिल गुट्टे यांच्या पार्थिवावर गुट्टेवाडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लातूर - लष्करातील जवान हवालदार अनिल जनार्दन गुट्टे (वय ४१) यांचे सोमवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोलकाता येथे ब्रेन हॅमरेजने उपचारादरम्यान निधन झाले. ते अहमदपूर तालुक्यातील गुट्टेवाडी येथील रहिवासी होते. ते कर्तव्यावर असतानाच ही घटना घडली.
सैन्यामध्ये तोफखाना गणर म्हणून गेल्या २१ वर्षांपासून ते कार्यरत होते. गेल्या रविवारी त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. उपचारासाठी कोलकाता येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. ही बातमीनंतर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाव शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब आहे.
अनिल गुट्टे यांच्या पार्थिवावर गुट्टेवाडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.