ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

By संदीप शिंदे | Published: June 26, 2023 05:12 PM2023-06-26T17:12:22+5:302023-06-26T17:12:53+5:30

माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे यांनी केले स्वागत

Gyanoba, Mauli Tukaram's chants of students dindi in Udgir | ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

googlenewsNext

उदगीर : आषाढी एकादशी निमित्त ज्ञानोबा, माऊली, तुकारामांच्या गजरात उदगीर शहरात शालेय विद्यार्थी व वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादात सोमवारी दिंडी काढली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकऱ्यांचे गोल रिंगण झाल्यावर माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले.

उदगीर येथील सद्गुरू शंकरलिंग महाराजांच्या मठात माजी आ. सुधाकर भालेराव, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून दिंडी शहराच्या मुख्य रस्त्यावरून ज्ञानोबा, माऊली, तुकारामांचा गजर करीत निघाली. माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , पोलीस उपअधीक्षक दिलीप भागवत यांनी या दिंडीचे दर्शन घेवून स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वांचे गोल रिंगण करण्यात आले. यावेळी दिंडीतील महिला व आ. संजय बनसोडे यांनी फुगडी खेळली. यावेळी दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

या दिंडीसाठी राजकुमार मोगले, अजित शिंदे, प्रशांत मांगुळकर, अश्वजित पाटील,आशिष अंबरखाने, आशिष पाटील, शिवा उप्परबावडे, नरेश सोनवणे, विकास तपसाळे, सतीश पाटील मानकीकर, चंद्रकांत टेंगेटोल, राहुल शहा, संदीप पाटील, विजय पारसेवार, नारायण वाकुडे, रामदास जळकोटे, श्रीनिवास एकुर्गेकर, प्रशांत जगताप, राजू मोरे, मदन पाटील, अक्षीत हेरकर आदींनी पुढाकार घेवून ही शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढली.

१५ शाळेतील विद्यार्थी, ३५ गावांतील भजनी मंडळांचा सहभाग...
या दिंडीत शहरातील १५ शाळांतील विद्यार्थी व ३५ गावांतील भजनी मंडळी यांच्यासह नामदेवराव कदम, अमोल निडवदे, मोतीलाल डोईजोडे, प्रा. पंडित सूर्यवंशी, नवनाथ गायकवाड, विश्वनाथ मुडपे, मनोज पुदाले, ॲड. दत्ता पाटील, धनाजी मुळे, उत्तराताई कलबुर्गे, सरोजा वारकरे, अनिता जाधव, गणेश गायकवाड, वैजनाथ गिरी यांच्यासह शहरातील भाविक सहभागी झाले होते. दुधीया हनुमान मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आरती व महाप्रसादाचे वाटप करून ही दिंडी विसावली.

Web Title: Gyanoba, Mauli Tukaram's chants of students dindi in Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.