मकर संक्रांतीला शेत-शिवारांची हाेते पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:41+5:302021-01-13T04:49:41+5:30

देश स्वतंत्र झाल्यावर निजाम राजवटीत असलेल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी येथील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा उभा केला हाेता. त्यावेळी या गावांमधून शेकडाे ...

Hand worship of farms on Makar Sankranti | मकर संक्रांतीला शेत-शिवारांची हाेते पूजा

मकर संक्रांतीला शेत-शिवारांची हाेते पूजा

Next

देश स्वतंत्र झाल्यावर निजाम राजवटीत असलेल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी येथील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा उभा केला हाेता. त्यावेळी या गावांमधून शेकडाे स्वातंत्र्य सैनिकांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले हाेते. त्यामुळे वेळा अमावस्येच्या दिवशी या भागात शेतकरी दुखवटा पाळातात. परिणामी, वेळा अमावस्या साजरी केली जात नाही, असे येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

औसा तालुक्यातील उजनी, आशिव वगळता अन्य गावांमध्ये वेळा अमावस्येचा उत्साहा यंदाही हाेता. दिवसभर शेत-शिवारात नागरिकांची वर्दळ हाेती. औसा शहरातील शेतकऱ्यांनी गावालगत असलेल्या शेतामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वेळा अमावस्या साजरी करण्यात आली. कडब्यांच्या पेंढ्यांची काेप उभारून त्यात पांडवांची पूजा करण्यात आली.

या गावात हाेते मकरसंक्रांतीला पूजा...

औसा तालुक्यातील उजनी आणि आशिव ही गावे वगळता तालुक्यातील सर्वच गावात वेळा अमावस्या साजरी करण्यात आली. दिवसभर शेत-शिवार माणसांच्या गर्दीने फुलून गेली हाेती. विविध खाद्य पदार्थ घेऊन सकाळी सात वाजल्यापासूनच शेतकरी बैलगाडीसह अन्य वाहनांतून शेताकडे जात हाेते. सायंकाळी उशिरापर्यंत शेत-शिवारातील लगबग हाेती.

Web Title: Hand worship of farms on Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.