पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात; रंगेहात पकडले
By राजकुमार जोंधळे | Published: February 15, 2024 02:00 AM2024-02-15T02:00:49+5:302024-02-15T02:01:18+5:30
याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
राजकुमार जाेंधळे / अहमदपूर (जि. लातूर) : सात लाखांच्या लाचेची मागणी करुन, तडजाेडीअंती पाच लाखांची लाच स्वीकारणारा अहमदपूर नगरपारिषदेचा मुख्याधिकारी, नगररचनाकाराला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लातूर येथील एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
मरशिवणी (ता. अहमदपूर) येथील सर्व्हे नंबर ५६ मधील ३६०० चाै.मी. क्षेत्रास वाणिज्य प्रयाेजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी मिळाली असून, त्यात अंतिम परवानगी मिळण्यासाठी अहमदपूर नगर परिषद येथे दाखल प्रकरणात २५ ऑक्टाेंबर २०२३ राेजी तक्रारदाराने ऑनलाईन चलन भरले हाेते. दरम्यान, याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधिताने तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी अहमदपूर नगरपरिषद येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराच्या प्रलंबित कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे (वय ५५ रा. माेतीनगर, लातूर) आणि अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डाेईफाेडे (३९ रा. टेंभूर्णी राेड, अहमदपूर) यांना पाच लाखांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई अहमदपूर येथील नगरपरिषद येथे करण्यात आली. यावेळी एसीबीच्या पथकाने दाेघांनाही अटक केली असून, याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
सात लाखांच्या लाचेची मागणी पण... -
तक्रारदार प्रलंबित कामांसाठी ५ फेब्रुवारीला अहमदपूर येथील नगरपरिषद कार्यालय गेला हाेता. यावेळी सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजाेडीअंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले हाेते. दरम्यान, बुधवारी एसीबीने लावलेल्या सापळ्यात पाच लाखांची लाच घेताना दाेघेही अडकले. - भास्कर पुल्ली, पाेलिस निरीक्षक, एसीबी, लातूर