आरोग्य विभागाने लावला २३ गावांचा जावईशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:26+5:302021-04-24T04:19:26+5:30

उदगीर : उदगीर तालुक्यात वाडी-तांड्यांसह एकूण ९७ गावे आणि ८७ ग्रामपंचायती असताना तालुका आरोग्य विभागाकडे मात्र तालुक्यात १२० गावे ...

The health department has searched 23 villages | आरोग्य विभागाने लावला २३ गावांचा जावईशोध

आरोग्य विभागाने लावला २३ गावांचा जावईशोध

Next

उदगीर : उदगीर तालुक्यात वाडी-तांड्यांसह एकूण ९७ गावे आणि ८७ ग्रामपंचायती असताना तालुका आरोग्य विभागाकडे मात्र तालुक्यात १२० गावे असल्याची नोंद दिसते. विशेष, यातील ११२ गावांत कोरोनाचा संसर्ग पोहोचल्याचा अहवाल या विभागाने प्रसारमाध्यमांना दिला आहे.

उदगीर तालुक्याचे विभाजन होऊन देवणी व जळकोट तालुक्यांची निर्मिती झाल्यानंतर या तालुक्यात वाडी-तांड्यांसह ९७ गावे शिल्लक राहिली आहेत. ही गावे तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीअंतर्गत आहेत. मात्र, तालुक्यात १२० गावे असल्याची नोंद तालुका आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील ११२ गावांत कोरोना पोहोचला असल्याचा अहवाल या कार्यालयाने प्रसारमाध्यमांना दिला आहे.

तालुक्यात निडेबन, मादलापूर, मलकापूर, हंडरगुळी, नळगीर या ५ गावांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कोरोना केअर सेंटरमध्ये ३३४ रुग्ण उपचार घेत असून, कोरोनामुळे १२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६ हजार ६०५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून, यातील ४ हजार ६३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

चुकीच्या माहितीमुळे मनस्ताप...

कोरोना चाचणी केलेली नसताना चार महिन्यांनंतर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तालुका आरोग्य कार्यालयाने अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रास पाठवला होता. त्यामुळे तेथील किशन मुगदळे कुटुंबीयांस मोठा मनस्ताप झाला होता. १९ मार्च रोजी अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र पथकाने मुगदळे कुटुंबीयांच्या घरी ठाण मांडले होते. वास्तविक, या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना चाचणी केली नव्हती. मात्र, चार महिन्यांपूर्वी त्यांची सून बाळंतपणासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिची कोरोना चाचणी केली असता, ती निगेटिव्ह आली होती. चुकीच्या अहवालामुळे मुगदळे कुटुंबीयांस मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

Web Title: The health department has searched 23 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.