लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; दिवसभर उन्हात काम केलं, घरी येताच शेतकऱ्याचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Published: April 25, 2023 06:41 PM2023-04-25T18:41:23+5:302023-04-25T18:41:31+5:30

औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा ४३ अंशांवर गेला हाेता.

Heat stroke victims in Latur district; A farmer dies after working in the sun for the whole day | लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; दिवसभर उन्हात काम केलं, घरी येताच शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; दिवसभर उन्हात काम केलं, घरी येताच शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. तगरखेडा येथील शेतकऱ्याचा दिवसभर उन्हामध्ये काम केल्याने उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली.

साेमवारी सायंकाळी शेतकरी पांडुरंग रामराव मुळजे (वय ६५, रा. तगरखेडा ता. निलंगा) हे शेतात अवकाळी पावसाने ज्वारीचे नुकसान झाले हाेते. पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने जागेवर असलेला पशुधनांचा चारा गाेळा करावा म्हणून ते दुपारपर्यंत शेतात कडबा गाेळा केला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका पाहुण्याच्या अंत्यसंस्काराला जाऊन ते तगरखेडा येथील घरी आले. अंघाेळ करून बाहेर येतानाच त्यांना अचानक चक्कर आली, त्यानंतर उल्टी झाली. शिवाय, डाेक्याला तापही चढला. यावेळी त्यांना उपचारासाठी दाखल केले असता, उष्मघाताने मृत्यू झाल्याचे डाॅ. डी. एम. कदम यांनी सांगितले.

औराद परिसरात पारा पाेहोचला ४३ अंशांवर...
औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा ४३ अंशांवर गेला हाेता. काही दिवस ढगाळ वातावरणाने तापमानात उच्चांकी तर कधी वादळ-वारा आणि पावसामुळे तापमानात चढउतार हाेत आहे. गत दाेन दिवसांपासून पुन्हा तापमानाचा पारा वाढला आहे. साेमवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ४१ अंश तापमानाची नाेंद झाली आहे.

भरदुपारी उन्हामध्ये घराबाहेर पडू नका...
सध्याला दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, अंगाची लाहीलाही हाेत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, शक्यताे भरदुपारी उन्हात घराबाहेर पडू नये, पांढरा कपडा डाेक्यावर वापरावा, शेतकऱ्यांनी शेतातील कामे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात करावीत.  - अनूप पाटील, तहसीलदार, निलंगा

Web Title: Heat stroke victims in Latur district; A farmer dies after working in the sun for the whole day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.