लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; औराद शहाजानी येथे ११५ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:34 AM2020-10-14T11:34:04+5:302020-10-14T11:45:27+5:30
Heavy rains in Latur district : जिल्ह्यातील तेरणा, मांजरा, नद्यांना पुर आला असून, तेरणावरील पाच उच्चस्तरीय बंधाऱ्याचे दारे उघडुन पाणी कर्नाटकात सोडून देण्यात आले आहे.
लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळी सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी मंडळात गेल्या १२ तासात तब्बल ११५ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, बंधाऱ्यांची सात दारे उघडण्यात आली असून, दोन बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठची शेकडो ऐकर शेती पाण्याखाली गेली आहे.
जिल्ह्यातील तेरणा, मांजरा, नद्यांना पुर आला असून, तेरणावरील पाच उच्चस्तरीय बंधाऱ्याचे दारे उघडुन पाणी कर्नाटकात सोडून देण्यात आले आहे. दरम्यान मांजरा-तेरणा नदी संगमावरील वांजरखेडा कोल्हापुरी बंधाऱ्याचे व साेनखेड येथिल बंधाऱ्याची दारे मॅन्युअली असल्यामुळे उचलता येत नसल्याने बँक वाँटर जमा होऊन नदी काठच्या शेकडो ऐकर शेतीत घुसले. यामुळे या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, राञभर झालेल्या या वादळी पावसाने हाता तोंडाशी आलेले सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
धरण क्षेत्रात जोरदार पावसाने आवक वाढली https://t.co/eVxEzkAaB3
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 14, 2020
भाजीपाला, फळबागांचे नुकसान...
पावसामुळे भाजीपाला, फळबागा यांचे माेठे नुकसान झाले असून, दाेन नदी काठावर असलेले शेतकरी शिवपुञ आग्रे यांची दहा ऐकरात पाच फुट पाणी थांबले आहे. आगरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यातून तयार झालेले वादळ महाराष्ट्र, कर्नाटक सीमेजवळ ताडूंरजवळ पोहचल्याने महाराष्ट्रातील जवळपास १०० किलोमीटर परिसरातील भागातील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. असे हवामान तज्ञ शिवानंद नेजी यांनी सांगितले.
कलदेव निंबाळा मार्गालगतची झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्पhttps://t.co/qHAb1yPYoI
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 14, 2020