सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:27+5:302021-08-01T04:19:27+5:30
अहमदपूर : राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे व शेखर चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी ...
अहमदपूर : राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे व शेखर चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत तहसील कार्यालयामार्फत पाठवली आहे. हे साहित्य तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. डोक्यावरील छप्पर वाहून गेल्याने अनेकजण बेघर झाले आहेत. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना आपला संसार सावरण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे ही मदत देण्यात आली. यात गहू, तांदूळ, साखर, डाळ, तेल, चहा पावडर, साबण आदी साहित्य आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर बागवान, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव खांङेकर, वसंत शेटकार, सोमशेखर चौधरी, चंद्रशेखर भालेराव, अशिष तोगरे, प्रकाश ससाणे, सय्यद ईलियास, फेरोज शेख, सचिन पङीले, अविनाश देशमुख, अशोक सोनकांबळे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, शिवराज हामणे, रवी गादगे, आकाश भालेराव, कपिल किने, ज्ञानोबा चंदेवाङ आदी उपस्थित होते.