‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, सीईओ ‘ऑन फिल्ड’; परीक्षा केंद्रांची स्वतः केली पाहणी

By संदीप शिंदे | Published: February 27, 2023 04:43 PM2023-02-27T16:43:54+5:302023-02-27T16:44:58+5:30

या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, २९ भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.

HHC Exam: In Latur Collector, CEO 'On Field' for 'Copy Free Exam'; Self-inspection of examination centers | ‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, सीईओ ‘ऑन फिल्ड’; परीक्षा केंद्रांची स्वतः केली पाहणी

‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, सीईओ ‘ऑन फिल्ड’; परीक्षा केंद्रांची स्वतः केली पाहणी

googlenewsNext

लातूर: जिल्ह्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांची बैठक घेवून यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. सीईओ अभिनव गोयल यांनी सोमवारी देवणी, तोगरी येथील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देवून पाहणी केली.

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले होते. परीक्षा कालावधीत केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्था, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी देवणी येथील योगेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि विवेकवर्धिनी महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला अचानक भेट देवून पाहणी केली. तसेच उदगीर तालुक्यातील तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्राची पाहणी केली. तसेच परीक्षा संपेपर्यंत सुमारे दोन तास ते याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वलांडी येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.

कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी...
जिल्ह्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असून, ३५ हजार विद्यार्थी सामोरे जात आहे. या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, २९ भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी, सीईओ आणि पोलीस अधिक्षकांनी विविध केंद्राना भेट देऊन पाहणी केली. आता दहावीच्या सुरु होणाऱ्या परीक्षेमध्येही या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Web Title: HHC Exam: In Latur Collector, CEO 'On Field' for 'Copy Free Exam'; Self-inspection of examination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.