हिप्पळनेरच्या माळरानास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:20+5:302020-12-22T04:19:20+5:30
चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर येथील माळरानावर सोमवारी सकाळी आग लागल्याचे निदर्शनास आले. ते पाहून स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न ...
चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर येथील माळरानावर सोमवारी सकाळी आग लागल्याचे निदर्शनास आले. ते पाहून स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत असल्याचे पाहून चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी अहमदपूर येथील अग्निशमन दलास पाचारण केले. या दलाने ही आग दुपारी १ वा.च्या सुमारास नियंत्रणात आणली. आगीत जवळपास ७२ एकरावरील माळरान जळाला आहे. यावेळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, वन अधिकारी गोविंद माळी, मंडळ अधिकारी एम.बी. बेजगमवार, तलाठी प्रमोद वंगवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
जीवित हानी नाही...
सदरील आग कशी लागली हे समजू शकले नाही. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा शेतीमालाचे नुकसान झाले नाही. केवळ तेथील शेतकरी महेश्वर स्वामी यांच्या शेतातील कडबा जळाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे तलाठी प्रमोद वंगवाड यांनी सांगितले.
***