उन्हाचा पारा वाढला; तापमान ३८ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:19+5:302021-04-26T04:17:19+5:30

ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन लातूर : हिंदू जनजागरण समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे ...

His mercury rose; Temperature at 38 degrees | उन्हाचा पारा वाढला; तापमान ३८ अंशांवर

उन्हाचा पारा वाढला; तापमान ३८ अंशांवर

Next

ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन

लातूर : हिंदू जनजागरण समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, ऑनलाईन वर्गामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड अशा ठिकाणाहून तरुण-तरुणी सहभागी होत आहेत. पहाटे ६ ते ७ या वेळेत बलोपासना वर्ग घेतले जात आहेत.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जवळपास १८ गाव-वाडी-तांड्यांनी पंचायत समितीस्तरावर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. सदरील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी पाणी नसल्याने नागरिकांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. अहमदपूर, जळकोट, रेणापूर आणि लातूर या तालुक्यांतून टंचाई निवारणासाठी प्रस्ताव दाखल असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: His mercury rose; Temperature at 38 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.