मुसळधार पावसाचा फटका; उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील तेलींग बुरुज ढासळला
By संदीप शिंदे | Published: August 9, 2022 05:29 PM2022-08-09T17:29:55+5:302022-08-09T17:31:19+5:30
२०१२ साली पुरातत्व विभागाने लाखो रुपये खर्च करून या बुरुजाची डागडुजी केली होती.
उदगीर : तालुक्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचा तेलींग बुरुज मंगळवारी सकाळी ढासळून पडला आहे. त्यामुळे किल्ल्यातील मंदिराकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
उदगीर तालुक्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे मंगळवारी सकाळी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचा तेलींग बुरुज ढासळून पडला. त्यामुळे उदागीरबाबा मंदिराकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. श्रावण सोमवार निमित्त सोमवारी उदागीर बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी मंदिर उघडण्या अगोदर हा बुरुज कोसळला.
२०१२ साली पुरातत्व विभागाने लाखो रुपये खर्च करून या बुरुजाची डागडुजी केली होती. या बुरुजाच्या खालून मंदिराकडे जाणारा मार्ग असल्याने भाविकांची व पर्यटकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. पुरातत्व विभागाने या रस्त्यावर पडलेले बुरुजाची दगड-गोटे काढून मंदिराकडे जाणारा मार्ग तात्काळ सुरू करून देण्याची मागणी भाविक व पर्यटकांमधून होत आहे.