गृहखाते मुख्यमंत्र्यांना पेलवेत नाही : विखे-पाटील
By admin | Published: September 9, 2016 08:15 PM2016-09-09T20:15:47+5:302016-09-09T20:15:47+5:30
राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ९ - राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पोलिसांवर हल्ला होतो. हे वाढते हल्ले पाहता गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेलवत नाही हेच सिध्द होते, अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे लातुरात केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भेटीसाठी लातूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारीच पोलिसांवर तुटून पडत आहेत हे गंभीर आहे. शिवसेना सरकारला सत्तेत राहून विरोध करते. त्यांची ही नौटंकी आहे. सरकारवर टिका करण्यापेक्षा तुम्ही सरकारमधून बाहेर पडा.
जलयुक्त शिवार ही आमच्या महात्मा फुले जलभूमी अभियानची कॉपी !
जलयुक्त शिवार योजना ही या सरकारची नाही. आमच्या सरकारने महात्मा फुले जलभूमी अभियान राबविले. त्याची या सरकारने कॉपी केली. मूळ कल्पना आमची. या सरकारने शब्द बदलून लोकांपुढे आणली आहे. राज्यातील सर्वात मोठे खोरे गोदावरी खोरे आहे. त्याची मजबुती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सह्याद्री आणि ठाणे-मुंबईला पडणारे पावसाचे समुद्राला मिळते. ते पाणी बोगद्याचे सहाय्याने कृष्णा - गोदावरीच्या खोºयात सोडल्यास राज्याचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. यासाठी बोगदेच हवेत. जम्मू-कश्मीरमध्ये अनेक रस्ते बोगद्यातून गेले आहेत. लोणावळामार्गे मुंबईला जाणारा एक रस्ता ४० किमी बोगद्यातून जातो. पाणी आणायला अडचण काय आहे ? असा सवालही त्यांनी केला. लातूर जिल्ह्याची पाण्याची स्थिती चांगली नाही. यासाठी उजनीतून सीना कोळेगाव येथून पाणी पाईपलाईनने मांजरा धरणात सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी लिफ्टींग झाले तरी पाणी द्या. कारवण टेंभू, म्हैसमाळ या योजना लिफ्टींगनेच पूर्ण झाल्या आहेत. तिकडे होते मग मराठवाड्यासाठी का नाही ? असा सवालही त्यांनी केला.
शिवराज पाटील चाकूरकरांशी विखे - पाटील यांची तीन तास चर्चा
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे कोणत्याही कार्यक्रमाशिवाय लातूरला आले होते. त्यांनी माझा हा दौरा खासगी असल्याचे सांगितले. या दौºयाला काहीही विषय नसून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची भेट घ्यायची होती. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठीच मी लातूरला आल्याचे ते म्हणाले. या भेटीत त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांशी मनसोक्त चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालू होती. नेमकी चर्चा काय झाली याचा तपशील काही मिळू शकला नाही. परंतु या चर्चेकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मात्र कान लागले होते.