भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू 

By संदीप शिंदे | Published: June 27, 2024 11:08 AM2024-06-27T11:08:37+5:302024-06-27T11:09:25+5:30

अपघातामधील मयत उदगीर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Horrific accident, two died on the spot after a speeding car hit the divider of the bridge  | भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू 

भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू 

उदगीर : उदगीर तालुक्यातील डिग्रस येथील पुलावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातामधील मयत व जखमींना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून, भरधाव कारने दुभाजकाला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. रस्त्यावरील कार बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. अपघातामधील मयत उदगीर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Horrific accident, two died on the spot after a speeding car hit the divider of the bridge 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.