आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा रुग्णालयांना विसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:23 AM2021-02-25T04:23:59+5:302021-02-25T04:23:59+5:30

शहरातील ६०० खाजगी आस्थापनांना पत्र शहरातील ५५० ते ६०० खाजगी आस्थापना इमारतीच्या मालकांना अग्निशमन विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. ...

Hospitals forget about fire prevention measures! | आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा रुग्णालयांना विसर !

आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा रुग्णालयांना विसर !

Next

शहरातील ६०० खाजगी आस्थापनांना पत्र

शहरातील ५५० ते ६०० खाजगी आस्थापना इमारतीच्या मालकांना अग्निशमन विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. जी प्लस १ व त्यापेक्षा अधिक मजली इमारतींमधील खाजगी आस्थापनांकडेही आग प्रतिबंधात्मक उपाययोजना नाहीत. कायद्यातील तरतुदीनुसार उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील ५०० ते ६०० आस्थापन कार्यालय प्रमुखांना पत्र पाठविण्यात आले आहे. परिपूर्ण उपाययोजना करून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे, असे या पत्रात मनपाच्या अग्निशमन दलाने म्हटले आहे.

शासकीय आरोग्य संस्थांचे ऑडिट पूर्ण

शहरातील शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट झाले असून, त्यांना केलेल्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, तसेच गांधी चौकातील शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यांना नाहरकत प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. ११० खाजगी रुग्णालयांना वारंवार नोटिसा पाठवून उपाययोजना केल्या जात नसल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख जाफर शेख यांनी सांगितले.

Web Title: Hospitals forget about fire prevention measures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.