दारुच्या बाटल्या फाेडून राडा; हाॅटेलचालकावर केला हल्ला

By राजकुमार जोंधळे | Published: July 18, 2023 11:22 PM2023-07-18T23:22:44+5:302023-07-18T23:23:43+5:30

लातुरातील घटना : हाॅटेल चालक जखमी...

hotel operator attacked bottles of liquor | दारुच्या बाटल्या फाेडून राडा; हाॅटेलचालकावर केला हल्ला

दारुच्या बाटल्या फाेडून राडा; हाॅटेलचालकावर केला हल्ला

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे,  लातूर: जेवणनंतर हाॅटेलमध्ये आपसात शिवीगाळ करून दारूच्या बाटल्या फोडत राडा करुन, हाॅटेल चालकावर धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना लातुरातील भांबरी चाैकात घडली. यामध्ये हाॅटेलचालक जखमी झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सचिन राजेंद्र जाधव (वय ३५, रा. लातूर) यांचे भांबरी चाैकात हाॅटेल असून, या हाॅटेलमध्ये विकी पाटील याच्यासह अन्य दाेघे जेवण करून टेबलवर आपसात शिवीगाळ करीत हाेते. त्याचबराेबर रिकाम्या दारूच्या बाटल्या फोडत हाेते. दरम्यान, जेवण झाले असेल तर बिल पेड करून निघून जा, असे सचिन जाधव म्हणाले असता, तू लई भारी आहेस का? तुला हाॅटेल चालवायचे की नाही? असे म्हणून धारदार वस्तूने वार फिर्यादीवर केला.

तो वार हुकवताना फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बाेटांना मार लागला. तू जर आमच्या नादाला लागला, तर तुझे हाॅटेल चालू देणार नाही, तुला जिवंत जगू देणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना लातुरातील भांबरी चाैकात घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार बिराजदार करीत आहेत.

Web Title: hotel operator attacked bottles of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.