घरफोड्या करणाऱ्या दाेन, सराईत गुन्हेगारांना अटक; चार वाहनांसह दागिने जप्त

By राजकुमार जोंधळे | Published: July 22, 2023 09:11 PM2023-07-22T21:11:24+5:302023-07-22T21:12:22+5:30

अधिक चाैकशी केली असता, चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

House burglars, criminals arrested; Jewelery seized along with four vehicles | घरफोड्या करणाऱ्या दाेन, सराईत गुन्हेगारांना अटक; चार वाहनांसह दागिने जप्त

घरफोड्या करणाऱ्या दाेन, सराईत गुन्हेगारांना अटक; चार वाहनांसह दागिने जप्त

googlenewsNext

लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दींत घरफाेड्या करणाऱ्या टाेळीतील दाेघा सराईत गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून कारसह चार चारचाकी वाहनासह साेन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चाैकशी केली असता, चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांत वाढ झाली असून, या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने जिल्ह्यातील घरफोड्यांची माहिती संकलित केली. संशयित आरोपींनी चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह कारमधून लातुरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिले.

या माहितीनुसार रेकॉर्डवर असलेल्या राम दगडू गर्गेवाड (वय २६), आकाश ऊर्फ भावड्या बाबूराव कांबळे (२४, दाेघे रा. मळवटी रोड, लातूर) यांना ताब्यात घेतले. अधिक चाैकशी करत झाडाझडती घेतली असता, ताब्यातील दाेघांनी इतर दाेघा साथीदाराच्या मदतीने एमआयडीसी, औसा, भादा, देवणी, चाकूर आणि उदगीरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. घरफोडीत चोरलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार असा दोन लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी चाकूर आणि उदगीर परिसरांतही चोऱ्या केल्याची कबुली दिली. चाैकशीमध्ये इतर गुन्ह्यांचा उलगडा हाेण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक फौजदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, योगेश गायकवाड, मनोज खोसे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली.
 

Web Title: House burglars, criminals arrested; Jewelery seized along with four vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.