लातूरमध्ये उष्माघातामुळे हमालाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 03:45 PM2017-04-26T15:45:03+5:302017-04-26T15:45:03+5:30
किल्लारी कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये आडतीवर हमालीचे काम करणारे सुभास भोसले (वय 45) कामासाठी चालत जात असताना त्यांना उन्हामुळे चक्कर आली.
Next
ऑनलाइन लोकमत
किल्लारी (जि. लातूर), दि. 26 - किल्लारी कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये आडतीवर हमालीचे काम करणारे सुभास भोसले (वय 45) कामासाठी चालत जात असताना त्यांना उन्हामुळे चक्कर आली. पोदार कॉम्पलेक्सच्या पुढील रस्त्यावर ते चक्कर येऊन पडले.
याबाबतीची माहिती मिळताच भोसले यांना त्यांच्या नातेवाईकाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ मोरे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परीवार आहे
मार्केट कमिटीने आडत दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करुन भोसले यांना श्रद्धांजील आर्पण केली. यावेळी आडत मार्केट ऑफीसचे कर्मचारी शेख अनंत बाबळसुरे, डिगंबर गावकरे, आरुण बाबळसुरे, संतोष दलाल, महालींग जिडगे, दत्तात्रय शिवणेचरी, चंद्रकांत बाबळसुरे, भोसले मनोज, सुभास सावंत, बाळु बिराजदार, बापु बिराजदार आदी उपस्थित होते.
सुभाष भोसले हे लहानपणापासून बिगारीचे कामे करीत होते. गेल्या तीन दिवसांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबी प्रंपच भागवण्यासाठी पै-पै जमवण्यासाठी उन्हामध्ये सतत काम करीत होता.
दरम्यान, किल्लारीत आठवडाभरामध्ये सतत ४० ते ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत सतत तपमान असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.