पतीचा डीपी, तर बायकाेचं स्टेटस... चॅटिंगही ठरले घटस्फाेटाला कारण..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:39+5:302021-09-26T04:22:39+5:30

बायकाे साेशल मीडियावर म्हणून वाद... साेशल मीडियावरून पाेस्ट करणे, फाेटाे शेअर करणे, फाेटाेत काेण आहे. अशा गाेष्टीवरून वाद हाेतात. ...

Husband's DP, wife's status ... Chatting also became the reason for divorce ..! | पतीचा डीपी, तर बायकाेचं स्टेटस... चॅटिंगही ठरले घटस्फाेटाला कारण..!

पतीचा डीपी, तर बायकाेचं स्टेटस... चॅटिंगही ठरले घटस्फाेटाला कारण..!

googlenewsNext

बायकाे साेशल मीडियावर म्हणून वाद...

साेशल मीडियावरून पाेस्ट करणे, फाेटाे शेअर करणे, फाेटाेत काेण आहे. अशा गाेष्टीवरून वाद हाेतात. ते शेवटी घटस्फाेटापर्यंत जातात. साेशल मीडियाच्या अतिरेकी वापराने चांगले सुखातील संसार दुभंगत आहेत. याशिवाय, नव्या जाेडप्यामध्येही तक्रारी वाढल्या आहेत. अतिशय क्षुल्लक कारण, माेबाइल वापरण्यातूनही हे वाद टाेकाला गेले आहेत. मग एकमेकांवर संशय घेण्याचे प्रकारही अलीकडे वाढल्याने, महिलांच्या छळाप्रकरणी तक्रार निवारण केंद्राकडे तक्रारी वाढल्या आहेत.

समजूतदारपणा हवा...

भराेसा सेलकडे येणाऱ्या बहुतांश तक्रारी या क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून आल्या आहेत. यातून दाेघांमध्ये समजूतदारपणा नसल्याचे दिसून आले आहे. अनेक तक्रारींत माेबाइलचा वापर, साेशल मीडियातील चॅटिंगचा प्रकारही समाेर आला आहे. यासाठी एकमेकांमध्ये विश्वास कायम जपून ठेवणे, साेशल मीडियाचे अतिरेक टाळणे, हे उपाय अमलात आणले पाहिजेत.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

या ठाण्यातही समुपदेशन...

लातूर शहरासह जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, चाकूर, निलंगा, औसा ठाण्यांमध्ये काैटुंबिक वादातून निर्माण हाेणाऱ्या तक्रारींत समुपदेशन केले जाते. यासाठी त्या-त्या ठाण्यातील महिला अंमलदार, अधिकारी पुढाकार घेतात. काही तक्रारी ठाण्याच्या स्तरावरच निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाताे. काही प्रकरणांत जाेडप्यांचे मनाेमिलन हाेते.

Web Title: Husband's DP, wife's status ... Chatting also became the reason for divorce ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.